shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळा आधुनिक आणि अत्याधुनिक करणार – मंत्री प्राजक्त तनपुरे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

राहुरी,दि.१४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व अत्याधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील सुमारे १०० आदिवासी आश्रम शाळा लवकरच डिजिटल करण्याचा माणस आहे. त्यासाठी केंद्राकडे निधीचीही मागणी केली आहे. ज्या शाळेत उद्योगपतींचे मुले शिक्षण घेतात त्याच पटीत माझ्या आदिवासी बांधवाच्या मुलांना देखील उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून ही योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. तालुक्यातील प्रिंप्री-वळण, चंडकापुर येथील आदिवासी बांधवांना आदिवासी विभागाच्या माध्यमातून मोफत घरपोहच जातीच्या दाखल्याचे वितरण ना.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते 
पुढे बोलताना ना. तनपुरे म्हणाले की, राज्यामध्ये आदिवासी बांधवांच्या मोठ्या समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने या विभागाचे राज्यमंत्रीपद घेतले. त्यामाध्यमातुन असे समोर आले की, योजनांचा लाभ या बांधवांना केवळ जातीचा दाखला नसल्याने मिळत नाही. म्हणून ह्या विभागाच्या माध्यमातून आम्ही सर्व्हे करून प्राधान्याने जातीचे दाखले मिळवून देत आहोत. या आदिवासी  विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन या दाखल्याच्या आधारे नोकरीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राहुरी मतदार संघामधील आदिवासी बांधवांना वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी पाठपुरावा या माध्यमातून केला जाणार आहे. प्रिंप्री -वळण येथील आदिवासी बांधवांना घरकुल योजनेसाठी जागेची येणारी अडचण लक्षात घेता शासन स्तरावर ह्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रसंगी पंचायत समिती सदस्य रविंद्र आढाव, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खुळे, मा.सरपंच ज्ञानेश्वर खुळे, अशोक कुलट, युवराज पवार, यशपाल पवार, वैभव जरे, शिवाजी जाधव, अरूण खिलारी, बाळासाहेब शिंदे, मुकींदा काळे, प्रकाश आढाव, जालिंदर कानडे, विलास पुंड, दादासाहेब  राजळे, बाबासाहेब डमाळे, दगडू साळवे, भगवान कानडे, आबासाहेब लहारे, शिवाजी डमाळे, रविंद्र गरूड, विष्णु पवार, शिवाजी जाधव, आप्पासाहेब गोलवड, जगन्नाथ जाधव, लखन कानडे, भागवत आगलावे आदिंसह बहुग्रामस्थ उपस्थित होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

close