shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्दीतील रक्षकच झालाय भक्षक; तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल कडून तरुणीवर बलात्कार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.

अहमदनगर: ११ ऑक्टोबर २०२१. (प्रतिनिधी)-      अहमदनगर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यातील कर्मचारी शकील सय्यद याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी ता. ०९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.                                                                  धक्कादायक बाब म्हणजे तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून ४ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास विळद घाट परिसरातील निंबळक बायपास परिसरात ही घटना घडल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे. पीडित तरुणीने या प्रकरणात फिर्याद दिली आहे.

तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शकील लतिफ सय्यद याने सदर तरुणीस स्विफ्ट कारमधून घेऊन जात असताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यावेळी पीडित तरुणीने त्यास विरोध केला आणि तरुणीने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यावर शकील सय्यद याने, ‘ मी पोलीस आहे. माझे मोठ्या मोठ्या गुन्हेगारांशी संबंध आहे तुला कापून फेकून देईन ,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
       सदर आरोपी शकील लतिफ सय्यद, बक्कल नंबर-१४५३ नेमणूक तोफखाना पोलिस स्टेशन अहमदनगर याच्या विरुध्द भां.द.वि. कलम ३७६ (१) ५०४,५०६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी डीवाय एसपी अजित पाटील यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक आठरे हे करत आहे.
        
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close