shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशकल्याणी संस्थेच्या स्पर्धांचे बक्षिसवितरण संपन्न ; पालक व शिक्षकांचा वसंत महोत्सवाला उदंड प्रतिसाद

प्रतिनिधी : सचिन जव्हेरी

करमाळा :  १० /   : यशकल्याणी संस्थेच्या वसंत महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.अॅड.बाबूराव हिरडे हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, सेंट्रल बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रशीद बागवान व तात्यासाहेब ढाणे हे होते.

थोर शास्त्रज्ञ वसंतराव दिवेकर यांच्या व्दित्तीय स्मरणाच्या निमित्ताने यशकल्याणी संस्थेने वसंत
महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट पाडून त्यांच्या या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी
विक्रमी म्हणजे जवळपास ४ हजार २६८ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेपैकी पहिली ते चौथीपर्यंतच्या गटातील यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण आज करण्यात आले.  या कार्यक्रमाला यशस्वी विद्यार्थ्यासह शहर व तालुक्यातील शिक्षक व पालकांची मोठी गर्दी होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी केले. यावेळी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.अॅड.हिरडे यांचेही भाषण झाले. याशिवाय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडल अधिकारी संतोष गोसावी यांनी केले. आभार हनुमंत जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन कवि दादा पिसे,विजय दुर्गुळे-पाटील आणि भिवा वाघमोडे यांनी केले.

 पोलीस कार्यालय जनतेचे मंदिर...
यशकल्याणी संस्थे मार्फत विद्यार्थ्यांच्या
जडणघडणीसाठी आयोजित केलेली स्पर्धा ही निश्चितच विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे. या
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास स्वतःचे जीवन तर यशस्वी होणारच परंतू महाराष्ट्र राज्य समृध्द झाल्याशिवाय राहणार नाही. नागरीकांनी पोलीसांकडे केवळ
ब्रिटीश परंपरेप्रमाणे न पाहता पोलीस हे जनतेचे सेवक आहेत हे गृहित धरूनच वाटचाल केली पाहिजे. पोलीस कार्यालय हे कार्यालय नसून
जनतेच्या सेवेचे मंदिर आहे व आम्ही आपले भक्त आहोत, ही भुमिका ठेवूनच करमाळाचे पोलीस काम करत आहेत. त्यामुळे कोणीही न दबकता
आपल्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी करमाळा पोलीसांकडे संपर्क करा असे पो .नि .सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले .
close