पुणे शहर काँग्रेस कमिटी तर्फे फ्री हेल्थ चेक-अप कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
फ्री हेल्थ चेक-अप कॅम्प अब्दुल बागवान यांनी मंगळवार १९ ऑक्टोबर २०२१ रोजी फ्री हेल्थ चेक-अप कॅम्प चे आयोजन केले .यात स्त्री रोग, अस्थि ,पोट विकार,चर्म विकार इ.वर उपचार करण्यात आले.तरी कोंढवा चे गरजुंनी निसार क्लिनिक लॅबबेक मंजिल इस्लामिया बेकरी जवळ पुणे.येथे भरपुर लाभ घेतला . अब्दुल बागवान हे नेहमीच विविध प्रकारे जनतेची सेवा करीत असतात.अतोनात परिश्रम घेऊन गरिब-गरजू लोकांना घर मिळवून दिली.कुठेही स्वार्थ न साधता पुढाकार घेऊन जनतेची सेवा आवर्जून करीत असतात.
त्यात दवाखान्यात ची काम पासुन ते अंत्यविधी सारखी मदत देखील ते करत असतात.कोरोना काळात कोरोना किट तसेच, लागणारे इतर साहित्याचे देखिल यांनी वाटप केले आहे.नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून अब्दुल बागवान हे जनतेची सेवा करीत असतात. अनेक अडचणीं वर मार्ग काढुन सामाजिक ,धार्मिक कार्यात ते हातभार लावत असतात.कोंढवा येथील लोक त्यांना खूप मान सम्मान देत असतात. त्यांच्या प्रति नेहमी लोकांना आदर वाटतो.साहेब अशीच जनतेची सेवा पुढेही करतील अशी सर्वांची सदिच्छा आहे.
हया कार्यक्रम ला बरेच मान्य वरानी उपस्थिति लावली मा रमेश दादा बागवे, नगरसेविका परविन हाजी फिरोज , नगरसेवक साई नाथ बाबर,हाजी फीरोज शेख,मां, नगरसेवक रईस भाई सुडके,मा,मजहर मनियार, समाज सेवक असलम भाई बागवान,रीयाज भाई बंगाली,अदी मान्यवर उपस्थित होते.

