सामान्य शेतकरी कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्त्व हरपले...!
स्व.शंकर मळीबा वाबळे...यांचे दुःखद निधन...!!
पारनेर । प्रतिनिधी :- स्व.शंकर मळीबा वाबळे यांचे आज पहाटे चार वाजता दुःखद निधन झाले असुन अंत्यविधी सकाळी ठिक ११.००वाजता वाबळेवस्ती(१०वा मैल),भाळवणी येथे होईल.
मुळचे ईरळवाडी ता.पारनेर येथील परंतु पुनर्वसन होऊन भाळवणी ता.पारनेर या ठिकाणी स्थाईक होऊन सामान्य शेतकरी कुंटुंब सांभाळताना त्यांच्या पाचही भावंडांची साथ लाभली.महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजार चे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे सबंध असणारे कुटुंब...!
त्यांच्या पश्चात बबनराव वाबळे भाळवणी परिसरातील प्रगतीशील शेतकरी, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर व्यक्तिमत्त्व, जगन्नाथ वाबळे हे पाटबंधारे विभागातुन सेवानिवृत्त झाले आहेत.
भास्कर वाबळे हे ऊत्क्रुष्ट दुध उत्पादक बरोबर प्रगतीशील शेतकरी आहेत.भागवत वाबळे मंत्रालयात कामाला आहेत.मुलगी रंगुबाई यांना खातगाव येथील शेतकरी कुटुंबात शिंदेपाटील परिवारात दिले आहे.
आणि नातवंडे असा मोठा परिवार...
भाळवणी परिसरातील एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व आणि वाबळे पाटील परिवारातील व नातेवाईकांना आपलसं वाटणारं हे व्यक्तिमत्त्व हरपल्याने संपुर्ण भाळवणी परिसरात शोककळा पसरली आहे.
अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वास भावपुर्ण आदरांजली...!

