प्रतिनिधी-(बेलापूर)- येथिल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग बेलापूर, मा.सहशिक्षण संचालक पुणे (उच्च शिक्षण विभाग ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य अभियानातंर्गत डॉ.चोखर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.कोकाटे यांनी सांगितले की, महाविद्यालय नियमितपणे सुरु झाले आहे परंतु अनेक विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.सदर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोविड- 19 लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ.संजय नवाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा,चंद्रकांत कोतकर,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.रुपारी उंडे ,प्रा.अशोक थोरात, डॉ.बाळासाहेब बाचकर,प्रा.विनायक काळे यांनी शिबीराचे संयोजन केले आहे.
शिबीर प्रसंगी आरोग्य सेविका कदम सिस्टर, गायकवाड सिस्टर,खरात सिस्टर यांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.
याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड व प्र.प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे यांनी केले आहे.

