shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवड शहरात पैसे उकळ्यासाठी धर्म बदलून केले लग्न, अनैसर्गिक संबंध ठेवले आणि दागिने घेऊन जिवे मारण्याची दिली धमकी..!


पिंपरी चिंचवड :-पैसे उकळ्यासाठी एका इसमाने धर्म बदलून महिलेशी लग्न केले, अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने फिर्यादी महिलेचे दागिने घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली. 02 फेब्रुवारी 2017 ते 06 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला
याप्रकरणी 31 वर्षीय पीडित महिलेने शुक्रवारी (दि.22) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुख्य आरोपी असलेला तिचा पती, सासरा, मोठा दीर, मामा, तसेच दोन महिला, असे सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी याने पैसे उकळण्याच्या व फसविण्याच्या उद्देशाने धर्म बदलून फिर्यादी पीडित महिलेचा धर्म स्वीकारला. तसेच मुख्य आरोपीने त्याचे स्वतःचे नाव व आडनाव देखील बदलले व फिर्यादी महिलेशी लग्न केले. त्यानंतर वारंवार अनैसर्गिक संबंध ठेवून फिर्यादी महिलेवर अत्याचार केला. फिर्यादी महिलेच्या घरच्यांकडून वारंवार पैशांची मागणी करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

 आरोपी 6 ऑक्टोबर 2021 रोजी महिलेचे दागिने घेऊन फरार झाला. आरोपीने फिर्यादी यांचे दागिने व घरच्यांनी दिलेल्या पैशाचा अपहार केला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
close