प्रतिनिधी : संजय भापकर
गुंडेगाव : ९ / नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील ज्योतीताई भापकर यांनी २०१३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यांची रायगड जिल्ह्यात त्यांची नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली होती परंतु ताईंनी नौकरीला नकार देऊन आपल्या सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले.
ताईनी आपल्या शेती बरोबरच गावच्या शेतकऱ्यानच्या शेतीचा विकास झाला पाहिजे यासाठी ताईंनी संपुर्ण शेतकरी गट चालु केला. या गटात शंभर शेतकरी सभासद आहेत आणि या गटातुन आज सतराशे एक्कर सेंद्रिय शेती केली जाते.
या सेंद्रिय शेती मध्ये विविध धान्ये, कडधान्य, भाजीपाला आणि फळे पिकवले जातात. ताई शेतकरी गटांना पेरणी पासुन ते माला चे बाजारपेठपर्यंत अनेक गोष्टीचे मार्गदर्शन करतात .आजपर्यंत या कार्यासाठी ताईना बऱ्याच *पुरस्काराने सन्मानीत* केले आहेत . खरंच या आधुनिक जगातील नवदुर्गेला सलाम..

