भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्यावतीने सोमनाथ पवार यांची इंदापूर तालुका संघटक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार .
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेल च्या इंदापूर तालुका संघटक पदी वडापुरी गावचे सोमनाथ बाबुराव पवार यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार इंदापूर येथे भटक्या विमुक्त
जाती जमाती संघटनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष तानाजीराव धोत्रे यांच्या हस्ते (दि.१४ ऑक्टोबर) रोजी करण्यात आले. व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
यावेळी रेडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मच्छिंद्र पवार, तुकाराम सोनटक्के सचिव इंदापूर विकास सेवा सोसायटी, धोंडीराम कांबळे युवा कार्यकर्ते , दिलीप शहाणे, सलीम मनेरी, सोहेल तांबोळी, योगेश पाडोळे, बाबुराव पवार रोजगार सेवक ग्रामपंचायत रेडा, स्पंदन चित्रपटाचे अभिनेते प्रसन्न पवार, मोसिन मनेरी इत्यादी उपस्थित होते.

