वालचंदनगर बाजारपेठ सर्व व्यापारी यांच्या वतीने नवीन पदभार स्वीकारल्याबद्दल प्राचार्य कुंभार सर व पर्यवेक्षक पिसे सर यांचा सत्कार करून केले अभिनंदन.
वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी एच. जी. कुंभार व पर्यवेक्षक पदी एम. एन. पिसे यांनी स्वीकारला पदभार.
इंदापूर प्रतिनिधी: (४ ऑक्टोबर २०२१) वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड वालचंदनगर संचलित श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वालचंदनगर याच्या प्राचार्यपदी एच. जी. कुंभार व पर्यवेक्षक म्हणून एम. एन. पिसे यांनी दिनांक१ ऑक्टोबर२०२१ रोजी पदभार स्वीकारला बद्दल आज (४ ऑक्टोबर) रोजी वालचंदनगर बाजार पेठ सर्व व्यापारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी आत्माराम लोंढे सर, काशिनाथ हिरवे सर,देठे सर, अमर निंबाळकर, विजू कांबळे, अमोल बोंद्रे, अमरीश कंदले, सप्नील अचलारे, चिंटू कंदले, पिणू दोभाडा, विशाल दुबल, शिरीष कस्तुरे, विक्रम मोरे, विजय पाटील, विजय सोलंकर इत्यादी उपस्थित होते.
वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कुंभार सर यांनी गेली २९ वर्ष शिक्षक म्हणून आपले योगदान दिलेले आहे .तसेच पिसे सर यांनी गेली २८ वर्ष शिक्षक म्हणून योगदान दिले आहे. त्यांची सदर ठिकाणी पदोन्नती झाल्याने वालचंदनगर परिसरातून त्यांना अनेकांच्या वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन होत आहे.

