राज्यमंत्री भरणे यांनी केला पाच किलोमीटर सायकल प्रवास.
भिगवण सायकल क्लबच्या ५० सदस्यांनी भिगवण ते भरणेवाडी सायकल प्रवास करून दिल्या राज्यमंत्री भरणे यांना दसऱ्याच्या शुभेच्छा.
इंदापूर प्रतिनिधी: भिगवण सायकल क्लबच्या ५० सदस्यांनी भिगवण ते भरणेवाडी सायकलवर प्रवास करून महाराष्ट्र राज्याचे वन राज्यमंत्री व पालकमंत्री सोलापूर जिल्हा दत्तात्रय भरणे यांची(दि.१६)रोजी भेट घेऊन दसऱ्याच्या शुभेच्छा व वृक्षारोपण केले.
भिगवण सायकल क्लबचे जंक्शन येथे दत्तात्रय भरणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व भिगवण सायकल क्लब सोबत जंक्शन ते भरणेवाडी ५ कि.मी सायकल चालवली, यावेळी समवेत श्रीराज भरणे व कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे चे अध्यक्ष अनिकेत भरणे यांनीही सायकल चालवली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भिगवण सायकल क्लब सदस्यांसोबत भरणेवाडी येथे वृक्षारोपण केले, भिगवण सायकल क्लब मध्ये विशेषतः महिला व मुलीनी पण वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच सायकल क्लबला सन्मानचिन्ह व फेटे बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी भरणे यांच्या निवास्थानी सायकल क्लब च्या सदस्यांना अल्पोपहार करण्यात आला होता.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडी येथे सुसज्ज ग्रामसचिवालय ,व्यायामशाळा ,अभ्यासिका यांची सायकलच्या क्लबच्या सदस्यांसोबत ओळख करून दिली.
यावेळी सायकल क्लब च्या वतीने सचिन बोगावत, रियाज शेख, सायकल क्लबचे अध्यक्ष रणजित भोंगळे, सचिव अल्ताफ शेख डॉक्टर अमोल खानावरे,कमलेश गांधी, केशव भापकर, अर्जुन तोडेकर, औदुंबर हुलगे, योगेश जाधव, मोहसीन सितारे, यांच्यासह क्लबचे ५० सदस्य सहभागी झाले होते.
सर्व भिगवन सायकल क्लबचे सदस्य यांना दत्तात्रय भरणे यांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

