shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शंभर दिवसाच्या विश्रांतीनंतर एरंडोल शहरात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले - धोक्याची घंटा...!


मुंबई येथून घरी आल्यामुळे, आई  लहान भावासह तिघे पॉझिटिव
                 प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल:-येथे ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी एक महिला व दोन मुले असे तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.आरोग्य प्रशासनातर्फे पॉझिटिव आलेल्या रुग्णांना तात्काळ मोहाडी रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले.
प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यां नागरिकांच्या शोध घेऊन त्याचे स्वाब घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
      एरंडोल शहरातील नव्या वसाहतीमधील प्रणव नगर येथील रहिवासी 17 वर्षीय युवक हा आठ दिवसांपूर्वी मुंबई येथे आपल्या मामाकडे गेला होता या ठिकाणी हा युवक आपले डिप्लोमा चे सर्टिफिकेट घेऊन घरी एरंडोल येथे परत आला. गेल्या चार दिवसापासून हा युवक एरंडोल शहरातील खाजगी उपचार घेत होता. त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्यामुळे आज दि.16 ऑक्टोंबर रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालय येथे स्वॅप घेण्यात आला यामध्ये तो पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या परिवारातील आई-वडील व लहान भाऊ यांना सुद्धा स्वाब तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे आले असता यामध्ये या युवकांच्या वडिलांनी दोघेही लसीचे डोस झाल्यामुळे त्याच्या अहवाल निगेटिव आला. व 40 वर्षीय आई ने फक्त एकच लसीचा डोस घेतल्यामुळे व इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेला 13 वर्षीय लहान भाऊ असे तीन अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या पॉझिटिव आढळून आलेल्या तिघही रुग्णांना तात्काळ जळगाव येथील मोहाडी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
एरंडोल तालुक्यात सहा जुलै पासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही परंतु 16 ऑक्टोंबर रोजी म्हणजे शंभर दिवसांच्या विश्रांतीनंतर तीन रुग्ण हे एरंडोल शहरात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या 17 वर्षीय युवकाचा लहान भाऊ शहरातील एका विद्यालयात परीक्षा देण्यासाठी गेल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा “ स्वाब घेण्याची सूचना प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांना दिल्या आहेत. तसेच नगरपालिकेस प्रणव नगर येथील परिसरास कंटेनमेंट झोन बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
close