shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंगरुळे प्रशालेचे मुख्याध्यापक गिरीष पट्टेद यांच्यावर जात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी


प्रतिनिधी : संजय वायकर

अक्कलकोट :   दि . २ / 
केएलई,मंगरुळे प्रशालेचे मुख्याध्यापक गिरीष पट्टेद यांनी जात चोरून `लिंगायत` झाल्याने त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणी लिंगायत कार्यकर्ते शेखर बाके यांनी संस्थेचे चेअरमन प्रभाकर कोरे,बेळगावी यांच्याकडे केली आहे.

       सविस्तर वृत्त असे की,केएलई संस्था ही अल्पसंख्याक संस्था असून मुख्याध्यापक हा लिंगायत खुल्या प्रवर्गातील असावा असा संस्थेचा ठराव आहे.संस्थेत सर्व मुख्याध्यापक `पट्टेद`वगळून लिंगायतच आहेत. अशी वस्तुस्थिती असताना गिरीष पट्टेद यांनी लोणार,कर्नाटकात वडार अशी असलेली आपली जात बदलून 'लिंगायत'बनावट दाखला संस्थेस सादर करून मुख्याध्यापक पद मिळवले आहे.

       मुख्याध्यापक गिरीष पट्टेद यांच्या वडिलांच्या,दोन भावाच्या दाखल्यावर लोणार/कर्नाटकात वडार अशी सेवा पुस्तिकेत नोंद आहे.हे सर्व अक्कलकोट तालुक्यातील करजगी,मैसलगी जिल्हापरिषद शाळेत कर्मचारी आहेत. शिवाय त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तशी नोंद आहे. त्यांच्या संपूर्ण पंधरा जणांच्या कुटुंबात केवळ गिरीष पट्टेद हे एकटेच लिंगायत कसे अशी तक्रार शेखर बाके यांनी केली आहे.

     गिरीष पट्टेद यांनी बनावट दाखला संस्थेस सादर करून मुख्याध्यापक पद मिळवले असून संस्थेची फसवणूक केली आहे.पंधरा दिवसात त्यांच्यावर जात चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी शेखर बाके यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत चेअरमन डॉ.प्रभाकर कोरे,आमदार कवटगीमठ,बी.आर. पाटील,संस्थेचे सचिव बी.जी.देसाई ,अनिल पट्टेद यांना देण्यात आले आहेत.निवेदन पर्यवेक्षक चंद्रकांत जोकारे यांच्याकडे देताना शेखर बाके,अक्षय बमनालीकर,प्रमोद कटलेवाड,सुधीर कुरले,यल्लप्पा गुंजले, शिवराज पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
  
close