पुणे । प्रतिनिधी (योगिता तांबोळी):
दैनिक शब्दमत च्या वतीने डॉ.प्रविन निचत ह्यांना आदर्श भारत रुग्णसेवा पुरस्कार, तर सौ. सुरेखा तुकाराम भोसले ह्यांना जीवन गौरव पुरस्कार, व श्री सुनिल ज्ञानदेव भोसले ह्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर
दैनिक शब्दमत वतीने ३० ऑक्टोंबर २०२१ रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे, असे दैनिक शब्दमतच्या वतीने कार्यकारी संपादक के.बि.शेख ह्यानी सांगितले.
बदलापुर येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ प्रविण निचत ह्यानी शतायुषी निसर्ग उपचार केंद्र मुंबई व होप फाऊंडेशन मुंबई तर्फे कोरोना साथीच्या काळात उल्लेखनीय व अपवादात्मक कामगिरी केल्या कार्याबद्दल दैनिक शब्दमतच्या वतीने आदर्श भारत रुग्णसेवा पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे . ते आरोग्य क्षेत्रात अहोरात्र आपल्या देशाची, समाजाची सेवा करीत असतांना स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत. ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर निशुल्क "घरगुती उपाय" सांगतात. त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून अखंडित व निरंतर चालू आहे. ज्यांना त्यांनी पाहिले नाही असे जवळपास एक लाखापेक्षाही अधिक रोग्यांना बरे केले आहे . याचा त्यांना गर्व नाही पण अभिमान असून आत्मिक समाधान वाटते. त्यांच्या या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन जवळपास 140 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे होप फाउंडेशन मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे.
तर महिला बचत गटाचे सदस्या शासकीय व शेतकरी संघटनेचे महासचिव महाराष्ट्र राज्य भूमी जनशक्ती किसान/ शेतकरी संघटना सौ. सुरेखा तुकाराम भोसले पुणे ह्यांनी निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून केल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार असल्याचे व आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उप आध्यक्ष महाराष्ट्र राज्य संपादक कुमार सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे ह्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करणार असल्याचे सांगितले आहे. विविध क्षेत्रातील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे पुष्पा ताई चौधरी आभिनेत्री गायिका व समाजसेविका यांचं उत्कृष्ट आभिनेत्री पुरस्कार पुणे शंतनु भामरे पुणे उत्कृष्ट निर्माता आभिनेता पुरष्कार जाहीर.

