shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शाळेत तू मला मारायचास, असं म्हणत १७ वर्षांनी रस्त्यात भेटलेल्या वर्गमित्राला बेदम मारहाण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार,२८ ऑक्टोबर , २०२१

पुणे:  "पुणे तिथे काय उणे" याच उक्तीचा प्रत्यय पुनः एकदा पुणे येथे प्रतेक्ष आलाय, कोण, कधी, कुठे, काय करेल, याचा काही नेम नाही. पुण्यातील औंधमध्ये एका इसमाने १७ वर्षांनंतर रस्त्यात भेटलेल्या आपल्या वर्गमित्राला क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
         लहानपणी शाळेत असताना मारहाण करत असल्याचा राग मनात धरून वर्ग मित्राला बॅटने जबर मारहाण केल्याची घटना औंध  परिसरात घडली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        याबाबत अमोल अंकुश कांबळे (वय ३३, रा. डीपी रस्ता, औंध) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार विकी शिरतर व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल व विकी बालमित्र आहेत. ते एकाच वर्गात शिकत होते. दोन दिवसांपूर्वी अमोल हे औंध परिसरातून घरी जात होते. त्यावेळी आरोपी विकी याने त्यांना रस्त्यामध्ये अडविले. मला ओळखले का अशी विचारणा विकीनं अमोलला केली. त्यावेळी अमोल याने आपण एकाच वर्गात शिकत होतो, असे सांगितले. वर्गात असताना खूप मारहाण करत होता, आता सापडला तुला सोडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्या ठिकाणहून अमोल हे घरी आले असता त्यांच्या पाठीमागे घरी येऊन त्यांना बॅटने जबर मारहाण केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस तपास करत आहेत.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close