नांदूर्खी । वार्ताहर :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या ठिकाणी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अस्थि विसर्जन झालेले आहे. म्हणून त्या गावाला ऐतिहासिक अण्णाभाऊ ची भूमी म्हणून तमाम बहुजनांनी मान्य केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात अण्णाभाऊंनी महान कार्य करूनही त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात केंद्र सरकारने 'भारतरत्न ' किताब देण्यास टाळाटाळ केली. मात्र महाविकास आघाडीच्या सरकार मधील राज्याचे सामाजिक न्याय राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अस्थीचे बोधेगाव येथे विसर्जन करण्यात आले असल्याने अनेक वर्षांपासून या भागाचा विकास व्हावा ही मागणी अनेक सामाजिक संघटनांकडून केली जात होती. मात्र अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात ठाकरे सरकारने या गावात साहित्य भूमी नावाने अण्णाभाऊ च स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मंत्रालयात राज्यमंत्री विश्वजित कदम, एन एस आयु चे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, अण्णाभाऊ साठे संशोधन परिषदेचे डॉक्टर दीपक चांदणे यांच्या सह अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी अधिकाऱ्यांबरोबर महत्वाची बैठक घेऊन हा प्रस्ताव तातडीने अंमलबजावणी साठी सादर करण्याचे सदर बैठकीत निर्देश देण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे तमाम बहुजन समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हे स्मारक संपूर्ण राज्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्याची शान असेल. असे विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रस्तावामध्ये भव्य स्मारकाबरोबरच अद्यावत ग्रंथालय विद्यार्थी साठी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण केंद्र स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अभ्यासिका केंद्र उभारून सर्व घटकातील मुला मुलींची शिक्षणाची दारे या माध्यमातून खुली होणार आहे.
याच अद्यावत ग्रंथालयामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जागतिक स्तरावर नावाजलेल्या कादंबऱ्या उपलब्ध होणार असून अण्णाभाऊ साठेनी जन्मभर केलेल्या समाजसेवेचे या निर्णयामुळे जणू काय चीज होणार असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, विराट प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे, हनिफ भाई पठाण, राज्य सरचिटणीस रामभाऊ पिंगळे, राज्य कार्याध्यक्ष समीर वीर, प्रदेशाध्यक्ष सुरेश अडागळे, लहुजी सेनेचे परशुराम साळवे, भैरवनाथ भारस्कर, संजय वालेकर, लोकस्वराज्य जण आंदोलनाचे advocate नितीन पोळ, निलेश सरोदे, रवींद्र भोंडगे, बहुजन रयत परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मंजाबापू साळवे, प्राध्यापक रघुनाथराव खरात, मातंग एकता आंदोलनाचे चंद्रकांत काळोखे, भाऊसाहेब आव्हाड आदी पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून स्वागत केले
राज्य सरकारने अण्णाभाऊ च्या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून बोधेगाव या ठिकाणी अद्यावत स्मारक उभारण्याचा नुकताच घेतलेला निर्णय तातडीने अमलात आणावा. त्याचबरोबर अण्णाभाऊंच्या नावाने "अण्णा लय भारी" या चित्रपटाला आर्थिक साह्य उपलब्ध करून द्यावे हा निर्णय तातडीने अमलात आणून तमाम महाराष्ट्रातील जनतेची अनेक वर्षापासूनची अपुर्ण असलेली मागणी पूर्ण करावी. मात्र निव्वळ घोषणांचा पाऊस पाडू नये अशी कळकळीची मागणी लहुजी सेनेचे राज्य सरचिटणीस रामभाऊ पिंगळे यांनी केली आहे.

