shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोगस दाखले प्रकरणी दोन लाचखोर एजंट पकडले गेले...! आता महसुल खात्यातील काही लाचखोर भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी कधी पकडले जाणार... ??


श्रीरामपूर - निवडणुकीवेळी बोगस जात प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक करत सत्तेवर विराजमान झालेल्या बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच बोगस जात प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या संबधित खात्याच्या काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या देखील सखोल चौकशा होऊन त्यांनाही कठोर शासन करण्यात यावे.


खऱ्या लाभार्थ्यांचा अधिकारी हिराऊन घेत खोट्या आणि लबाड तथा फसवेगीरी करणाऱ्या महाभागांना सदरील गंभीर स्वरुपाचा गुन्हा करणेकामी खोटी जात प्रमाणपत्र देणाऱ्या महसुल खात्याच्या काही खादाड अधिकारी,कर्मचाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देण्यासाठी जिल्हाभरातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन उपोषणे,आंदोलन असे शांतीच्या मार्गाने पाठपुरावा करत जनजागृती करुन महसूल खात्याच्या खाबूगीरी करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवत उपेक्षितांना उचित न्याय मिळवून देण्याकामी पुढे यावे,अशी मागणी जोर धरु लागली आहे.

बनावट जात प्रमाणपत्र बाबतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच राहुरीत दोन लाचखोर खाजगी एजंट पकडले,आता जातीचे बोगस दाखले देणारे महसूल खात्यातील काही खादाड लाचखोर कर्मचारी,अधिकारी कधी पकडले जाणार ? याची खरे लाभार्थी अतुरतेने वाट पहात आहे.
close