shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रीन फाउंडेशन यांच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन..!



अहमदनगर । प्रतिनिधी : 
लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती येथील वनविभाग परिसरात ग्रीन फाउंडेशन  यांच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कोळपे वस्ती येथे वनविभाग परिसरात वृक्षारोपण तसेच श्रमदान मोहीम राबविण्यात आली. ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष  अमित जगताप व वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

याप्रसंगी वनविभाग चे बळीराम वायकर यांनी वन्यजीव संरक्षण आपली जबाबदारी असल्याचे सांगत त्याविषयी मनोगते व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात आढळणाऱ्या विषारी, बिनविषारी सर्पांच्या प्रजातींची माहिती देत सर्पदंशनंतर उपचारा विषयी देखील उपस्थितांना जागरूक केले. 

महाराष्ट्रात सर्वाधिक सर्पांचा मृत्यू भीतीपोटी आणि अंधश्रध्देतून होत असल्याचे यावेळी ते म्हणाले. सर्प हा अन्नसाखळीमधील अत्यंत महत्त्वाचा सरपटणारा प्राणी आहे. सर्पदंशापासून मानवाने स्वत:ला कसे सुरक्षित ठेवावे? विषारी सर्पांचा वावर कधी व कोठे असू शकतो? याविषयीदेखील त्यांनी बारकाईने माहिती समजावून दिली. ग्रीन फाऊंडेशन  सदस्य विशाल धडके वन्यजीवप्रेमी यांनी वन्यजीवांचे रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान घ्यावयाची खबरदारी याविषयी माहिती सांगितली. अलिकडे ‘रोडकिल’ही समस्या मानवाप्रमाणेच वन्यजीवांसाठीदेखील धोक्याची बनली आहे.

वन्यजीवांचे रस्त्यांवर मृत्यूमुखी होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगून लक्ष वेधले. पक्षीमित्र  कार्तिक जाधव यांनी गिधाडसारख्या पक्षी दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्याच्यासंवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. सुदैवाने पुण्याच्या सभोवताली गिधाड अजूनही अस्तित्वात असून त्यांचे संवर्धन संरक्षण आवश्यक असून त्यासाठी ‘गिधाड संरक्षित क्षेत्र’ तत्काळ विकसीत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी वनव्यवस्थापन समिती ,वनविभाग लोणी काळभोर, ग्रीन फाऊंडेशन, जनाई शिक्षण संस्था, विभा गिरिश ट्रस्ट, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय शेंडगे यांनी आभार मानले.
close