shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बहुजनांच्या हाती सत्ता आणायची असेल तर प्रस्तापित लोकांची सत्ता येणाऱ्या निवडणुकीमध्ये उलथून लावा-सचिनभाऊ साठे


सिल्लोड तालुक्यात विविध ठिकाणी शाखेचे उदघाटन


औरंगाबाद । प्रतिनिधी(सतिश लोखंडे) :-  सिल्लोड तालुक्यात विविध गावांमध्ये मानवहित लोकशाही पक्षाच्या शाखेचे उदघाटन मा.सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते करण्यात आले. 

बहुजनांच्या हाती सत्ता आणायची असेल तर प्रस्थापित लोकांची सत्ता येणाऱ्या निवडणुकीमध्ये उलथून लावा असे प्रतिपादन सचिन भाऊ साठे यांनी वांगी बुद्रुक येथील येथील कार्यक्रमात सांगितले. सिल्लोड शहरासह तालुक्यातील मोढा खुर्द,वांगी बुद्रुक,भरडी, डोंगरगाव ,अन्नवी , खेडी ,लिहा ,अशा सात गावांमध्ये मानवहित लोकशाही पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
मातंग समाजावर आजसुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचारांच्या घटना घडत आहेत. यांची खंत कोणीही शासनकर्ता करू शकत नाही.
मातंग समाजाचा व सर्व बहुजनांचा मतापुरता वापर राजकीय पक्ष करीत आहे,असल्यांची खंत सचिन भाऊ साठे यांनी व्यक्त केली. 

समाजाने राजकीय पक्षाचे फक्त मतदार बनवुन राहण्यापेक्षा हक्कदार बनवून राहायला पाहिजे.स्वताची वोट बँक तयार करून प्रस्तापितांना विरोध करण्यासाठी मानवहित लोकशाही पक्षाचे पदाधिकारी महाराष्ट्र भर पक्षाचे काम मोठ्या ताकदीने करीत आहे.

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत मानवहित लोकशाही पक्षाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असुन घर तिथं कार्यकर्ता व गाव तिथे शाखा स्थापन करण्याचे आदेश यावेळी सचिन भाऊ साठे यांनी कार्यकर्त्यांना दिले. यावेळी मानवहित लोकशाही प‌क्षाचे सिल्लोड तालुकाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात सिल्लोड येथे सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले.

यावेळी शाखा उद्घाटन दरम्यान मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल सरोदे , औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रमेश सुर्यवंशी , जिल्हा उपाध्यक्ष औरंगाबाद सतिश लोखंडे , अशोक कांबळे .जिल्हा कार्याध्यक्ष, संजय इंच्चें , सुभाष इंच्छे , नानाभाऊ अनवीकर , जालना जिल्हा , संजय देवरे कन्नड तालुका अध्यक्ष , सखाराम अहिरे तालुका संपर्क प्रमुख , रामलीला ताई जाधव महीला तालुका अध्यक्ष , लक्ष्मण लोखंडे वाकी ,सोमीनाथ लोखंडे जामडी ,फकीरचंद तांबे युवा तालुका अध्यक्ष ,शिवराम कांबळे , शुगदेव कांबळे , नामदेव खेञे , बाबुराव अहिरे, रतन अंभोरे, मनोज अहिरे , साहेब राव सोनवणे , रविंद्र महाले , संजय कांबळे, नितीन सौदागर , रमेश लोखंडे ,कडुबा ल़खंडे आणा लोखंडे , विजय लोखंडे , चिंचोली लिंबाजी ,सोमीनाथ लोखंडे टाकळी अंतुर ,राजधर शेलार गणेशपुर , सुनिल लोखंडे कारभारी लोखंडे वाकी , शांताराम सौदागर बरकतपुर आदी उपस्थित होते.
close