shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी सनाताई शेख..!!



हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) 

दि.७,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष पदी सनाताई शेख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच महिला अन्याय अत्याचार विरोधी दक्षता कोर कमिटी नाशिक जिल्हाध्यक्ष पदी व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी सनाताई शेख यांची निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



सनाताई शेख ह्या अगोदर नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्याच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महिला अध्यक्षा असतांना त्यांनी तिळभाट येथे गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतांना समितीच्या माध्यमातून आदोंलन केले व आज तिळभाट येथे स्थानिक ग्रामपंचायतने गावकर्‍यांना पाण्याची व्यवस्था करुन दिली.समितीच्या करंजाळी टिम व तिळभाट टिम तसेच पेठचे कार्यकारी अध्यक्ष उमेश राम मोरे यांच्या साह्याने सनाताई शेख यांनी अनेक आदोंलन करुन सर्वसामान्य जनता,शेतकरी तसेच महिला सक्षमीकरण बद्दल योगदान दिल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील(बाबा)खंडापुरकर यांनी सनाताई शेख यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष नाशिक जिल्हाध्यक्ष पदी,महिला अन्याय अत्याचार विरोधी दक्षता कोर समिती नाशिक जिल्हाध्यक्ष पदी तसेच ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या निवडी बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील(बाबा)खंडापुरकर ,राष्ट्रीय समन्वयक गिरीराज महीराज,राष्ट्रीय प्रवक्त्या सुनिताताई कसबे,राष्ट्रीय संघटक शोभाताई बल्लाळ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अँड.राणीताई स्वामी,विधी विभाग अध्यक्ष अँड.विजय पवार,संपर्कप्रमुख संजय गवारे,दिव्यांग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे,उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिपकभाई ननावरे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,नाशिक जिल्हाध्यक्ष भिवानंद अप्पा कोळे,मंगेश सावळे,प्रमोद केंद्रे,हिरा भोसे,प्रतिभा बोरसे, संगिता चौधरी,पंचफुला भोसे, निशिगंधा खांडवी,हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख पत्रकार विश्वनाथ देशमुख आदीकडुन अभिनंदन होत आहे.

close