shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेद्वारे राहुरी-पाथर्डी-नगर मतदारसंघाचा घेतला आढावा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.

राहुरी: राट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेद्वारे पक्षाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधत आहेत. आज राहुरी-पाथर्डी-नगर मतदारसंघाचा आढावा घेतला. 
मा. जयंत पाटील साहेब यांनी मतदारसंघाचा बूथ 
निहाय आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मा. शरद पवार साहेब यांच्या विचारांशी संलग्न असलेला राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळात पोहोचून विकासाचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रशासनाला मदत करेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे जसंपदामंत्री  नामदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

निळवंडे धरण प्रकल्पाच्या कालव्याची कामे येत्या 1/2 वर्षातपर्यंत पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमतेत वाढ केली जाईल असे मा. जयंत पाटील त्यांनी आश्वासित केले आहे. यावेळी भागडा चारी प्रकल्प व इतर योजनांबाबतही सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणी मी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, शहराध्यक्ष संतोष आघाव व कार्यकर्ते उपस्थित होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600.

close