वडापूरीतील श्री नाथ मंदिरात बसवले सीसीटीव्ही कॅमेरे.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील वडापुरी या गावात पुरातन काळातील श्री नाथांची संजीवनी समाधी असलेल्या मंदिरात श्री भैरवदेव ट्रस्ट वडापुरीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे(दि.३० ऑक्टोबर) रोजी बसवण्यात आले असून ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत जगताप - तोबरे यांच्या हस्ते नारळ फोडून कॅमेरा चालू करण्यात आला.
यावेळी , श्रीनाथ सोसायटीचे अध्यक्ष किसन सावंत, सदस्य प्रताप बगल, श्रीनाथ सह.पाणी पुरवठ्याचे उपाध्यक्ष हरिभाऊ माने, हरिदास गवळी, धोंडीराम सुतार ,विलास सुतार, संतोष सुतार, संतोष देवकर इत्यादी उपस्थित होते.
या मंदिरात होम-हवन, नाम जप यज्ञ, रोज सायंकाळी हरिपाठ, सकाळ- संध्याकाळी आरती, एकादशी निमित्त भजन तसेच अखंड हरिनाम सप्ताह असे भाव भक्तिमय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात. सुंदर अशी झाडे असलेला परिसर आणि भक्तिमय स्वरूपातील सेवेकरी यांच्या भावभक्तीने श्रीनाथ मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरणात या ठिकाणी आहे.

