shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्योग व्यवसायामध्ये ग्राहकांना दर्जात्मक , विश्वासदर्शक व आपुलकीची सेवा पुरवावी - युवा उद्योजक अमोलराजे इंगळे.युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते हाॅटेल श्रीतेज स्नॅक्स सेंटर व लवटे इंजिनीअरिंग आणी फॅब्रिकेशनचे उद्घाटन संपन्न.

उद्योग व्यवसायामध्ये ग्राहकांना दर्जात्मक , विश्वासदर्शक व आपुलकीची सेवा पुरवावी - युवा उद्योजक अमोलराजे इंगळे.

युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते हाॅटेल श्रीतेज  स्नॅक्स सेंटर व लवटे इंजिनीअरिंग आणी फॅब्रिकेशनचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:भुताष्टे तालुका माढा जि. सोलापूर येथे दि २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी हाॅटेल श्रीतेज व स्नॅक्स सेंटर व लवटे इंजिनीअरिंग आणी फॅब्रिकेशन चा उद्घाटन सोहळा इंदापूर तालुकातील युवा नेते व उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या
हस्ते  इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला .

.या वेळी उद्योजक दिनेश लोंढे, पश्चिम महाराष्ट्र रासपचे युवक अध्यक्ष अजित पाटील, पश्चिम महाराष्ट्र रासपचे अध्यक्ष माऊली सलगर, माढा तालुका भाजपचे चिटणीस योगेश पाटील, हिंगणगाव शिवसेनेचे तात्यासाहेब यादव पाटील, नारायण आसबे, पडसाळी माजी सरपंच शिरिषकुमार पाटील, भुताषटे माजी सरपंच दिलीप  यादव, मेजर माऊली पाटील, विकास सेवा सोसायटी चेअरमन महादेव लवटे, अनिल लोंढे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते 
यावेळी अमोलराजे इंगळे म्हणाले की, युवकांचा नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे कल असावा. उद्योग व्यवसायामध्ये ग्राहकांना दर्जात्मक , विश्वासदर्शक व आपुलकीची सेवा पुरवावी आणि आपला व्यवसाय यामध्ये प्रगती करून आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लवटे यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असल्याने ते चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय चालवतील त्यांच्या या व्यवसायास इंगळे परिवाराच्या वतीने शुभेच्छा अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राहक संरक्षण संस्था सोलापूर जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ यादव यांनी केले.
 
कार्यक्रमाचे आयोजन बप्पा साहेब लवटे, सागर भाऊ यादव, धनराज लवटे, सुग्रीव सलगर, धुळा मामा वहणमाने, धनाजी लवटे, जोतिराम लवटे यांनी सुंदर नियोजन केले तर सूत्रसंचालन  विलासराव दोलतडे यांनी केले.
close