शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा ,प्रमोद चौधरी एरंडोल, जिल्हा जळगाव दिनांक २८नोव्हेंबर २०२१
एरंडोल/प्रतिनिधी:-एरंडोल शहरातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक नथ्थु बापू मिया यांचा उरूस दिनांक 29 नोव्हेंबर पासून सुरू होत असून 29 नोव्हेंबर रोजी संदल चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तसेच दिनांक1 डिसेंबर रोजी होणाऱ्या कुस्त्या दिनांक 2 डिसेंबर रोजी होणारी कव्वाली चा कार्यक्रमाची परवानगी नसल्याने व कोरोना प्रादुर्भाव पाहता यावर्षी कव्वाली व कुस्त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे गेल्या दोन वर्षा पासून कोणाच्या प्रादुर्भावा मुळे पुन्हा रद्द करण्यात आलेला होता मात्र यावेळी कोरोणाचे नियम पाळून संदल चा कार्यक्रम होणार आहे.
सदर उरूस हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून या ठिकाणी असंख्य हिंदू मुस्लिम भावी भक्त हे दर्शनाला येत असून पंच कमिटी मध्ये नगराध्यक्ष रमेश मकुद सिंग परदेशी अध्यक्ष उपाध्यक्ष गुलाम हुसेन बागवान तर सचिव जावेद मुजावर खजिनदार जहिरोद्दीन शेख कासम माजी नगराध्यक्ष रवींद्र शांताराम महाजन माजी उपनगराध्यक्ष अशोक सुखदेव चौधरी नूरुद्दीन शेख महंमद सुभाष माधव पाटील इकसबाल पिंजारी इस्माईल शेख हाशम सुनील चौधरी शेनपडु वाल्डे आरिफ शेख हसन हे ट्रस्टी म्हणुन काम पहात आहे यावर्षी उसला सर्व नागरिकांनी येणाऱ्या व्यापाऱ्यांनी कोरोना विषाणू चे नियम पाळून लसीकरण का मी सहकार्य करावे असे पंच कमिटीच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष रमेश परदेशी व सचिव जावेद मुजावर यांनी आवाहन केले आहे

