shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

औरंगाबादेत हळहळ! 5 दिवसांवरती लग्न, अचानक मुलगी गेली पळून, हताश बापाची आत्महत्या, चिठ्ठीत असं लिहिलं..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१
औरंगाबाद : घरच्या लोकांनी ठरवलेलं लग्न पाच दिवसांवरती येऊन ठेपलेलं असताना मुलगी अचानक दुसऱ्या मुलाबरोबर पळून गेली मुलीने केलेल्या कृत्यामुळे समाजात आपली बदनामी होणार मुलीच्या वडिलांनी स्वत:ला संपवून घेतल्याची दुर्दैवी घटना शनिवारी औरंगाबाद मध्ये घडली आहे. विशेष म्हणजे बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहिले की, मुलीला पुन्हा घरात घेून का.. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाच दिवसांवर आले होते लग्न.......
 
वाहनचालक असलेल्या 48 वर्षीय मुलीच्या वडिलांनी मुलीने केलेल्या कृत्यामुळे आत्महत्या केली. मात्र आपल्याच कुटुंबातील कोणा सदस्याची बदनामी होऊ नये, यासाठी त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहलेल्या चिठ्ठी देखील लिहली आहे. मात्र यामध्ये घरच्या लोकांचा उल्लेख केला नाही. या कारणास्तव कुणाचेचे नाव या वृत्तात देण्यात आलेले नाही. सदर गृहस्थाच्या घरात 19 नोव्हेंबर रोजी मुलीचे लग्न ठरले होते. मात्र मुलीचे दुसऱ्याच मुलावर प्रेम होते, याची माहिती वडिलांना नव्हती. ते मुलीचे लग्न थाटा-माटात करण्याच्या तयारीत होते. सर्व नातेवाईकांना आमंत्रणे गेली, हॉल, केटरिंगची व्यवस्थाही झाली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी मुलगी घर सोडून निघून गेली. खूप शोधाशोध केल्यानंतर हताश वडिलांनी सातारा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ऐन लग्न तोंडावर आल्यावर मुलीने उचललेल्या पावलामुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते. हा धक्का सहन न झाल्याने बापाने शनिवारी रात्री थेट संग्रामनगर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर झोकून देत आत्महत्या केली.


मुलीला माझ्या घरात आता स्थान नाही......

तसेच या घटनेतील मुलीच्या वडीलांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली त्यामध्ये त्यांनी आपल्या बायकोला उद्देशून लिहिलं आहे कि ‘मी जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील, मात्र आता त्या मुलीला माझ्या घरात स्थान नाही’ असा मजकुर मृत व्यक्तीने लिहलेल्या चिठ्ठीत सापडला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close