शिर्डी प्रतिनिधी :
माजी मंत्री राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाजपा उत्तर भारतीय आघाडी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेश शर्मा व भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस सचिन भैरवकर यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी व पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागावे असा संदेश राम शिंदे यांनी दिला.

