shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हा तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय – तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत

हा तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय – तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत
इंदापूर प्रतिनिधी:केंद्र सरकारने लागू केलेली तीन कृषि विषयक कायदे माघारी घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली शुक्रवार दि.१९ रोजी गुरुनानक जयंती दिनी केली आहे.या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन देखील पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.त्यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी हा तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय असल्याचे म्हटले आहे.हे तिन काळे कायदे रद्द व्हावे यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध स्तरावर आंदोलन करण्यात आले होते. इंदापूर तालुक्यात देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते. या मागणीला आता यश आल्याने हा खऱ्या अर्थाने सर्व आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांचा विजय आहे.असं सावंत म्हणाले आहेत.


 
या मागणीला मोदी सरकारने कृषिप्रधान देशात मान्य करायला एवढा वेळ लावला ही दुर्दैवी गोष्ट आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या बरोबर खंबीरपणे काँग्रेस पक्ष व राहुल गांधी ठामपणे उभे होते. कॉंग्रेस पक्ष सदैव जनहितासाठी काम करणारा पक्ष आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे.असं ही त्यांनी नमूद केलं आहे
close