संत महंतासह मान्यवरांची राहणार उपस्थित..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
रेणुका अँग्रो इंडस्ट्रीज नारेवाडी (धावज्याचीवाडी) गुळ उद्योगाच्या गळीत हंगामाचा भव्य शुभारंभ आज दुपारी १ वा.संत महंतासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवगावचे उपसरपंच तथा युवा नेते अतुल (दादा) मुंडे यांनी केले आहे.
केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांनी सुरू केलेल्या रेणूका अँग्रो इंडस्ट्रीज नारेवाडी (धावज्याचीवाडी) गुळ उद्योगाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवारी दु.१ वा.होणार आसून शुभाशीर्वाद देण्यासाठी ह.भ.प.रतन महाराज सासुरेकर,ह.भ.प.भगवान महाराज वरपगावकर,ह.भ.प.नारायण महाराज पिंपरीकर,ह.भ.भ.माऊली महाराज बरडकर,ह.भ.प.महंत श्रीराम महाराज विडेकर,ह.भ.प.केशव महाराज टाकळीकर यांची उपस्थित राहणार आहेत.तर बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे यांच्या शुभहस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे.
दरम्यान प्रा.सौ.माधुरीताई विजयकांत मुंडे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा होणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अतुल (दादा) मुंडे यांनी केले आहे.

