shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी,कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याची तक्रार..!!

(अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे तक्रार) 

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) दि.१,हिंगोली जिल्ह्यात ग्रामिण भागामध्ये खेडे,तांडे वस्ती येथील गोरगरीब गरजु लोकांकरीता शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त असुन देखील पूर्णवेळ मुख्यालयी राहात नसल्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार मिळत नसल्याने हेळसांड होत आहे. या विषयी अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने दि.२९ आँक्टोंबर शुक्रवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. 




हिंगोली जिल्हा अंतर्गत ग्रामीण भागात खेडे,तांडे व वस्ती येथील गोरगरीब गरजु लोकांकरीता शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी,परीचालीका, ए.एम.एन,इतर कर्मचारी नियुक्त असुन देखील पुर्णवेळ मुख्यालयी राहात नसल्यामुळे गरीब व गरजु रुग्णांवर वेळेवर प्राथमिक उपचार मिळत नाहीत.आणि विनाकारण आर्थिक भुर्देंड सहन करुन तालुक्याच्या किंवा जिल्हयाच्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागते त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचा वेळ व पैसा खर्च होतो.व तसेच काही वेळा रुग्णांना व जखमींना योग्य उपचार न करता थातुर-मातुर विलाज करुन गरज नसतांना देखील हिंगोलीला पाठविण्याचे प्रकार सतत वाढत आहेत.या सर्व प्रकारची हिंगोली जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कल्पना असुन देखील ते या सर्व परीस्थितीचे गांभिर्य न घेता दुर्लक्ष करीत आहेत.


या संबधीत वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचा-यांच्या चुकावर जाणुन-बुजुन दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसुन येते.तसेच हिंगोली जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांचा कर्मचा-यावर कुठलंच नियंत्रण नसल्यामुळे सर्वजन मनमानी कारभार चालवत असल्याचा गंभीर आरोप देखील दिलेल्या निवेदनात केला आहे.तरी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी हिंगोली जिल्हा आरोग्य केंद्राच्या अधिकार्‍यांना आदेशीत करुन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांची होत असलेली गैरसोय दुर करावी जेणे करुन रुग्णांना योग्यवेळी उपचार मिळेल त्याच बरोबर नातेवाईकांना मानसिक त्रास होणार नाही व आर्थिक नुकसान देखील होणार नाही.निवेदनावर समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,मराठवाडा मुख्य संघटक सचिन दराडे,हिंगोली जिल्हाध्यक्ष न्याय व विधी अँड मधूकर कांबळे,हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष रमेश कुटे,युवा जिल्हाध्यक्ष अनिल लोंढे,जिल्हा कोषाध्यक्ष आशाताई घोडके,सेनगाव तालुका महिला अध्यक्षा वंदनाताई थिट्टे,सेनगाव तालुकाध्यक्ष गजानन टेकाळे,तालुका कार्याध्यक्ष संतोष पोले,हिंगोली तालुकाध्यक्ष बाळु सुर्वे,गजानन श्रीरामे,आश्रुबा खंदारे, सखाराम आसोले,अशोक सुदाम मस्के,गोपाल मस्के आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

close