shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा शहरातील आठवडे बाजार तात्काळ सुरू करा -हेल्प टीम..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१
देवळाली प्रवरा :  येथील आठवडे बाजार तात्काळ सुरू करण्यात यावा अशी विनंती देवळाली प्रवरा हेल्प टीमने आज देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नेहा भोसले मॅडम (IAS) यांना निवेदन देऊन विनंती केली आहे. 
     
  गेल्या कित्येक दिवसापासून कोरोना मुळे देवळाली प्रवरा शहरातील आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे येथील शेतकरी, व्यापारी आणि गावच्या बाजारपेठेवर त्याचा विपरीत आर्थिक परिणाम झाला आहे. 
       देवळाली मधील लहान शेतकरी व व्यापारी यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढणेसाठी हे आठवडे बाजार तात्काळ सुरू होणे गरजेचे आहेत. म्हणून आज देवळाली प्रवरा हेल्प टीमचे दत्तात्रय कडू पाटील (माजी सनदी अधिकारी), आप्पासाहेब ढुस (आंतरराष्ट्रीय खेळाडू), सुनील विस्वासराव (उपाध्यक्ष, शिवाजीनगर व्यापारी असो.), प्रशांत कराळे (शेतकरी संघटना),  गिताराम बर्डे (जिल्हाध्यक्ष, एकलव्य संघटना), सागर सोनवणे, विजय कुमावत (शहर अध्यक्ष, बांधकाम कामगार संघटना) आदी सदस्यांच्या स्वाक्षरीत व उपस्थिती मध्ये  निवेदन देऊन विनंती केली आहे.
      या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, ज्या शेतकरी आणि व्यापारी यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना आठवडे बाजारात बसनेसाठी आणि शेतमाल विक्रीसाठी परवानगी देऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून देवळाली प्रवरा शहरातील आठवडे बाजार तात्काळ सुरू करणेसाठी आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती या निवेदनात शेवटी केली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close