जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. ९७६८४२५७५७
पनवेल/नवी मुंबई: सिडको आणि अतिक्रमण हे एक समीकरणच बनलं आहे. ही अतिक्रमणं करणारे कोण असतात? ते असतात एकतर राजकारणी अथवा त्यांचा वरदहस्त असलेले माजुर्डे हस्तक.
नवी मुंबईत पनवेलजवळच्या उलवे नोडमधील शेलघर गावातही असाच एक अतिक्रमणधारक आहे. राजरोसपणे सिडकोच्या जागेवर घराच्या नावाखाली गयावया करून बांधकाम केलं...नंतर ग्रामपंचायतीला हाताशी धरून असेसमेंट बनवली... आणि नंतर तिथं चक्क बारच उघडला. बार दणक्यात चालल्यावर त्याने तिथे आणखी मोठा बार बांधायला सुरूवात केली आहे.
हे महाशय आहेत पनवेलच्या शेलघर गावातले अनंत शंकर म्हसकर नावाचे. या अतिसामान्य माणसाची डायरेक्ट सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करण्याची हिंमत कशी झाली असावी? याचं उत्तर आम्ही शोधलं आणि आम्हाला धक्का बसला.
या माणसाच्या आडून सिडकोच्या हडप केलेल्या या जागेवर अतिक्रमण करीत बार चालवण्याचा उद्योग करणारा खरा सूत्रधार आहे रायगड काँग्रेसचा अध्यक्ष.!
आम्हाला या प्रकाराची माहिती मिळताच आम्ही या बेकायदेशीर बांधकामाचा पाठपुरावा सुरू केला आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची इच्छा नसताना कार्यवाही सुरू करून घेतली आहे, यापुढेही ही कारवाई आमच्याकडून करून घेतली जाईल.
रायगड काँग्रेसला आधीच घरघर लागली आहे. अनेक ठिकाणी धड उमेदवार देता येत नाही अशी परिस्थिती असताना.... त्यांच्या पक्षनेतृत्वाला अवदसा सुचली आणि महेद्र घरतला त्यांनी सरळ अध्यक्ष बनवला...!!
सिडकोमधील अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी काम करण्याचा आव आणून सिडकोला पकडायचं....आणि मग भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सिडकोचे अधिकारी घाबरले की स्वतःची बेकायदेशीर बांधकामं पुढं रेटायची... नवी मुंबई सिडकोच्या मानेवर बसलेलं हे काँग्रेसचं भूत अनेक वर्षांपासूनचं आहे...सिडकोच्या जागा हडप करण्याचा या काँग्रेसी नेत्याचा हा नवा धंदा बघून महात्मा गांधीसुद्धा स्वर्गात ढसाढसा रडत असतील.
याची लाज काँग्रेसला कधी वाटली तर आधी रायगडला स्वच्छ माणूस अध्यक्ष म्हणून नेमा. निदान आम्हाला हे लिहायची आणि तुमच्या नावाने खडे फोडायची वेळ तरी येणार नाही.
महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या तत्वांमधे अजून तरी एवढी ताकद आहे की एखादा स्वच्छ चारित्र्याचा भिकारी पदावर बसवलात तरी तुम्ही पुढे जाल...याची खात्री बाळगा. तुम्हाला असल्या अतिक्रमण करणाऱ्या धनदांडग्यांची गरज लागणार नाही.
या धनदांडग्यांना सिडकोचे अधिकारी घाबरत असतील, पण आम्ही घाबरत नाही. भीतीपोटी जे अधिकारी महेंद्र घरतच्या बेकायदा कामांना दुर्लक्षित करतील त्यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. लवकरच या प्रकरणातील आणखी अपडेट आपल्याला दिले जातील.
काँग्रेसने आपल्या या नेत्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करून स्वतःची उरलीसुरली वाचवावी ही माझी त्यांना नम्र विनंती श्री. रमेश नामदेव देवरूखकर, पत्रकार यांनी पनवेलकरांना/नवी मुंबईकरांनाअसे आवाहन केले आहे.

