एरंडोल प्रतिनिधी
"लढा विलीनीकरणाचा"
एरंडोल :-एरंडोल आगारातील100% एस टी कर्मचारी यांच्या संपाला काल दुपारपासून सुरूवात झाली,दुपारून कोणतीही बस मार्गस्थ झाली नाही,संपात सर्व चालक,वाहक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झालेत अचानक सुरू झालेल्या संपामुळे प्रवाशी बांधवांना नक्कीच त्रास झाला मात्र या साऱ्या गोष्टीला राज्य सरकार जबाबदार असल्याची भावना कर्मचारी यांनी बोलून दाखविली.
एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरणं झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची प्रतिक्रिया कर्मचारी यांनी दिली. तसेच हा संप फक्त कर्मचारी यांनी केलेला असून कोणत्याही संघटनेचा या संपाशी संबंध नसल्याची माहिती यावेळी संपात सामील कर्मचारी यांनी दिली. परंतु सदरच्या संपाला लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशभैय्या परदेशी यांनी दुपारून येऊन प्रत्यक्ष पाठींबा दिला तसेच काल संध्याकाळी माजी जि प उपाध्यक्ष पी सी पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा जाहीर करीत भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन दिले, यावेळी त्यांचे सोबत पक्षाचे तालुका पदाधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.
