shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ,ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे निवेदन..


श्रीरामपूर (प्रतिनिधी) - स्थानिक निवडणुकीत आपले राजकिय हित साध्य करु पाहत असलेल्या काही जातियवादी शक्तींनी त्रिपुरा राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लिम समुदायास टारगेट करत त्रिपूरा राज्यात धुडगूस घातला आहे.


काही जातियवादी पक्ष,संघटनेच्या माध्यमातून मुस्लिमांचे धार्मिक स्थळे मस्जिद,मदरसे आणि घरावर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात असल्याच्या निषेधार्थ येथील ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्यावतीने
जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान तथा ऍड.हारुन बागवान यांच्या उपस्थितीत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांच्या नावे असलेले निवेदन श्रीरामपूर तहसिलदारांना देण्यात आले.

त्रिपुरा राज्यातील काही जातियवादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना इस्लाम धर्मियांच्या विरोधात भडकविण्याचे काम केले तथा त्रिपुरा राज्यात सर्वत्र भारतीय दंड संहिता कलम १४४  लागु असताना देखील वरील काही जातियवादी संघटनेच्या  पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह मोर्चा काढून इस्लाम धर्माचे संस्थापक आणि मुस्लिमांविरोधी घोषणा देत तथा यावरच न थांबता प्रेषित पैगम्बर यांच्यावर अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग करत मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ असलेले मस्जिद, मदरशांमध्ये तोडफोड करून यामध्ये मुख्यता अगरताला मस्जिद,धरमनगर मस्जिद, रतनवाडी मस्जिद, महाराणी उदयपुर मस्जिद,आणि कृष्णा नगर मस्जिद तथा अनेक मस्जिदींची तोड़फोड़ करत आग देखील लावण्यात आली.

यासह मुस्लिम बांधवांना अमानूषपणे मारहाण करत त्यांची दुकाने आणि घरांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचविले गेले.लोकशाहीच्या राज्यात प्रत्येकाला आपापल्या धर्माचे आचरण करण्याचा पुर्णतः अधिकार आहे,मात्र लोकशाही नकोशी असलेली काही जातियवादी संघटना देशात अराजाकता माजविण्याचे मनसुबे रचुन सामाजिक शांतता भंग करु पाहत आहे म्हणून वरील जातीयवादी संघटनांवर तथा त्या संघटनेच्या जातियवादी पदाधिकाऱ्यांवर घटनेतील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता कलम 153 A,153 B, 294, 295 A,188,171,147, criminal act.रासुका,गुंडा ऐक्ट.120 B,124 A,UAPA नुसार योग्य आणि कडक कारवाई करण्यात यावी सोबतच अशा जातीयवादी संघटनेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी,मुस्लिमांना पुरेसे संरक्षण देण्यात यावे, झालेल्या नुकसानीची शासनस्थरावरुन भरपाई देण्यात यावी,आदी बाबींच्या मागण्या करत लोकशाहीचे हित संवर्धन राखण्यास अपयशी ठरलेल्या त्रिपूरा सरकारला त्वरित बरखास्त करण्यात यावे. अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली असून या निवेदनावर ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी फय्याज बागवान,ऍड.हारुन बागवान, आरीफ कुरेशी, शौकत शेख, जाकिर शहा, अजिज अत्तार, शकील शेख, मुजम्मील शेख, नासिर शेख सरदार (राजुभाई) कुरेशी तथा पत्रकार सुनिल शिरसाठ, लक्ष्मीकांत शर्मा आदींच्या स्वक्षऱ्या आहे.
close