महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमातीच्या यादीतील २८,२९ व ३० वर असलेल्या कोळी, ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार या आदिवासी जमातींना अनुसूचित जमातीचे जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे यासंदर्भात आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे, आंदोलन प्रमुख नामदेव ये ळवे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, प्रा.संदीप तवर, सरपंच प्रकाश चव्हाण, पत्रकार शरद नवसारे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, अशोक काकुळदे, कमलेश मगरे, मधुकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने धुळे उपविभागीय अधिकारी यांना मंगळवार दिनांक २/११/२०२१ रोजी निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात अशी मागणी करण्यात आली की, जे अर्जदार सन १९५० पूर्वीच्या अनुसूचित जमातीच्या उल्लेख असलेला किंवा निवासाचा सर्वसाधारण ठिकाणाबाबत चा लेखी पुरावा सादर करू शकत नाही. अशा अर्जदाराच्या संदर्भात महाराष्ट्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्रे (देण्याची व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) नियम २००३, नियम ३(४) मधील तरतुदीनुसार आवश्यक कागदोपत्री पुरावे उपलब्ध नसल्याची कारणे नमूद केलेले शपथपत्र (नियम ३(२) अनुसार नमुना अ_१ मधील प्रतिज्ञा पत्रा व्यतिरिक्त) अर्जासोबत प्राप्त करून घ्यावे, त्यावर संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी योग्यरीत्या चौकशी करून, प्रकरणाच्या गुणाव गुणांवरून वरून अर्जदाराला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे. या नियमांचा वापर केल्यास आदिवासी जमातीचे विद्यार्थी जातीच्या दाखल्यापासून वंचित होणार नाहीत. पर्यायाने सर्व आदिवासी योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल. प्रवेश, नोकरी पासून कोणीही वंचित होणार नाही. वरील समस्या लक्षात घेऊन त्यांना १० ते १५ दिवसात अनुसूचित जमातीचे जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे अशी विनंती करण्यात आली.

