इंदापूर तालुक्यातील अभंग , मसलखांब , मोमीन , गायकवाड यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.
इंदापूर प्रतिनिधी:दि २८ रोजी राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर विंग यांचे पुणे जिल्हा शाखेचे जिल्हास्तरीय २ रे अधिवेशन पुणे येथे पार पडले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील कोरोना काळातही शाळा बंद असताना मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देता अविरतपणे विविध पद्धतीने गुणवत्ता वाढवून उल्लेखनीय कामगिरी करणारे दिलीप अभंग , तात्या मसलखांब , इशरत मोमीन , ज्योती गायकवाड यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले.
यावेळी प्रोटान महाराष्ट्र राज्य सचिव प्रा डाॕ मिलिंद कांबळे , पुणे जिल्हा अध्यक्ष डाॕ अरूण कांबळे , कार्याध्यक्ष डाॕ दत्तात्रय टिळेकर यांचेसह पुरस्कारार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

