गीतेच्या सतराव्या अध्यायात जे आहार तत्व सांगितले आहे त्याचा अनुवाद परमपूजनीय विनोबाजी भावे यांनी गीताई या पुस्तीकेत खालीलप्रमाणे केलेला आहे,
*सत्व प्रीति सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी। रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्विक।।*
*खारे रुक्ष कडू तिख अम्ल अत्युष्ण दाहक। दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस।।*
*रसहीन निमालेले शिळे दुर्गंधी-युक्त जे। निषिद्ध आणि उष्टे ही तामस प्रिय भोजन।।*
आपला दैनंदिन आहार कसा असावा हे सांगताना वरील ओव्यांमधून आहाराचे सात्विक, राजस/ रजोगुणी आणि तामस/तमोगुणी असे तीन प्रकार असल्याचे वर्णन केलेले आहे. तीन प्रकारच्या आहाराचे वर्णनही अत्यंत बाळबोध शब्दांतून सांगितलेले आहे.
सात्विक आहाराने बळ वाढते.
राजस आहार हा दुःखद आणि रोग निर्माण करणारा असतो.
तामस म्हणजे तमोगुणी अर्थात सदैव ज्यांच्या शरीरामध्ये क्रोध भरलेला आहे अशी व्यक्ती. म्हणजे तामस आहाराने मनुष्य क्रोधी होतो. हा आहार निषीद्ध म्हणजे वर्ज करावा असे नमूद केलेले आहे.
तेव्हा बलवृद्धीसाठी केवळ सात्विक आहार घेणे हे क्रमप्राप्त आहे असे आहार तत्व गीतेच्या सतराव्या अध्यायात नमूद केलेले आहे.
हे आहार तत्व समजून घ्या, व इतरांना समजावून सांगून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या आरोग्य, पर्यावरण साक्षरता अभियानात सहभाग नोंदवा.
*लेखक : चंद्रकांत शहासने निसर्गोपचारक.*
*मोबाईल क्र.९८८१३७३५८५*

