शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१
अहमदनगर : नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी काेविडच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यूचे खापर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर फाेडत आराेग्य विभागाची पाठराखण केली.
या नवीन इमारतीसाठा आग सुरक्षा प्रतिबंधक सुविधा यंत्रणा कार्यान्वित करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली नसल्याचे सांगितले.आरोग्य विभागाची पाठराखण करताना या घटनेची सात दिवसात चौकशी समिती अहवाल देणार असून त्यानंतर जबाबदार अधिकार्यांवर कारवाई केली जाईल, अशी सारवासारव आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडीमारासमाेर आराेग्यमंत्री टाेपे यांनी काढता पाय घेतला.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सायंकाळी जिल्हा रुग्णालयात जावून घटनास्थळाची पाहणी केली. आराेग्यमंत्री टाेपे म्हणाले, आरोग्य विभागाकडून केवळ निधी उपलब्ध करून दिला जातो.
तेथील सर्व सुविधांची, इमारतीचे बांधकाम आणि इतर सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करण्याची जबाबदारी ही बांधकाम विभागाची असते. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ही इमारत २०१७-१८ मध्ये पूर्ण झाली हाेती. इलेक्ट्रिक आॅडिटसाठी साडेसात लाख रुपये, आग प्रतिबंधक सुविधेसाठी २ लाख ६० हजार रुपयांचे अंदाजपत्रक मंजरीसाठी बांधकाम विभागाकडे जूनमध्ये बांधकाम विभागाकडे पाठविले हाेते. अनेकवेळा आराेग्यविभागाकडून पाठपुरावा करून त्याला मंजुरी मिळाली नाही.जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपद्धतीविषयी मंत्री टोपे यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी चाैकशी अहवाल सात दिवसात सादर करताच सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, अशी सारवासारव करत पत्रकारांसमाेर काढता पाय घेतला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

