शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२१
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले,वय 42 वर्ष यांना काल एका अज्ञाताने अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली.
या खंडणीखोराने दोन कोटी रुपये घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एका इमारतीत येण्याचे सांगितले.तसेच पोलिसांना कळवले तर त्रास होईल अशी धमकी देखील दिली.या प्रकारावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काल रात्री खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज रोजी याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके हेदेखील पथकासह श्रीरामपूर शहरात हजर झाले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

