shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गायिका अनुराधा पौडवाल यांनी घेतले शनिदर्शन..!


प्रतिनिधी । मोहन शेगर:-
सोनई :- जगभर सुप्रसिद्ध असलेल्या गायिका श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी शनिवार दि.६ रोजी शनिवार व भाऊबीज चे औचित्य साधून शनिशिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेतले.

पौडवाल यांनी काल शिर्डी येथील साईबाबा चे दर्शन घेतले होते. त्यानंतर शनिशिंगणापूर येथील उदासी महाराज मठात शाश्रोक्त पध्दतीने शनिदेवाला अभिषेक घातला.त्यांनी ५ किलो तिळाचे तेल ,पेढा,नागिनींचे पाने,सुपारी,करदुरा, शनीचरणी अर्पण केला.त्यावेळी त्यांचा बानकर कुटूंबियाच्या वतीने प्रथेप्रमाणे पोलीस पाटील ॲड.सयाराम बानकर व सुरेश बानकर यांनी  साडी देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार केला.

       
यावेळी पौडवाल म्हणाल्या की,मला दोन वर्षांपासून शनिशिंगणापूर ला येता आले नाही,ही खंत मनामध्ये होती,सन १९९१ पासून दरवर्षी शनिशिंगणापूरात भाऊबीज व शनिदर्शनासाठी येते.बानकर भाऊंची सेवा, आशीर्वाद ,भाऊबीज शनिदर्शन,असा प्रवास झाला,आज शनिदर्शन झाले पण बानकर भाऊचा आशीर्वाद राहिल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.शनिशिंगणापूर हे माझे माहेर आहे, मी शनिदेवाला भाऊ मानले असून स्व.बाबुराव बानकर यांचा ग्रंथ लवकर प्रसिद्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
      
माहेरच्या साडीची ओढ..!
       
शनिमंदिरात ॲड.सयराम बानकर व सुरेश बानकर यांनी बानकर भाऊंच्या वतीने हिरव्या रंगाची पैठणी साडी देताना त्या म्हणाल्या ,"माहेरची साडीची ओढ आज पूर्ण झाली" 
          
या प्रसंगी व्यवस्थापक संजय बानकर, रंगनाथ शेटे, संदीप सिकची,बाळासाहेब बानकर, आदी उपस्थित होते.
close