shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोशल मीडियावरील मैत्री पडू शकते महागात..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ 
अहमदनगर :  प्रत्येकाच्या जीवनात एक तरी मित्र असा असतो की तो एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमीच साथ देत असतो. प्रत्येकीच मैत्री नेहमीच होत असते. मात्र आता सोशल मीडियावर झालेली मैत्री महागात ठरू लागलेली आहे. अशा अनेक घटना आता समोर येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मैत्री करताना प्रत्येकाने सावधानगी बाळगणे गरजेचे आहे.
सोशल मीडियामुळे जग जवळ आलेले आहे, असे म्हटले जात आहे. नाण्याला जशा दोन बाजू आहेत, तसेच सोशल मीड़ियाच्या बाबतीत घडत चालले आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आलेले असले तरी जवळचे मात्र दूर गेलेले आहे. हे ज्याच्या लक्षात आले. त्याने दूर गेलेले जवळ आणले आहेत. ज्याच्या लक्षात नाही आले त्याचे जवळचे आज दूर गेलेले आहेत.

सोशल मीडियावर सध्या दूरचे व कधी परिचित नसलेले एकमेकांना संदेशाच्या रुपाने जवळ येत आहे अनोळखी असले तरी संदेशामुळे ते मित्र बनत आहेत. सुरवातीला काहीजण गोड बोलून त्यानंतर आपले खऱे रुप दाखवित आहेत. याचे प्रत्यय अनेकांनी घेतलेले आहेत. मात्र अजूनही अनेकजण सावध झालेले नसून ते त्यातच गुरफडलेले आहेत.

सोशल मीडियावर आता दोन प्रकारची मंडळी कार्यरत आहे. एक तर समाजाला मदत करणारी व समाजाला लुटणारी. यामध्ये समाजाला मदत करणार्यांकडून सध्या मदतीचे काम होत आहे. मात्र लुटणारी वेगवेगळी कारणे सांगून सोशलवर झालेल्या मैत्रीचा गैरफायदा करीत आहेत. 

यामध्ये फेसबुक, व्हाॅटसअप, हाईक आदी सोशल मीडियाचा समावेश आहे. सुरवातीला ग्रुप व इतर माध्यमातून मैत्री झाल्यानंतर खोटी कारणे सांगून पैसे लाटण्याचे उद्योग केले जात आहे. 

काहींनी असे उद्योग करण्यासाठी वेगवेळ्या नावे ग्रुप केलेले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून इतर सदस्यांना आपल्या ओळखीचे लोक सहभागी करायला लावून पैसे उकळण्याचा उदयोग केलेला आहे. 

असाच एक प्रकार एका मुंबईतील तरुणाने केलेला असून त्याचा मनस्ताप चार मैत्रीणींना सहन करावा लागलेला आहे. त्याने शायरी नावाचा ग्रुप सुरु करून त्यात महिलांना सहभागी करून घेतले. त्यानंतर त्याने सर्वांनी वेगवेळे चॅट करून एकमेकींची माहिती घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 

त्यानंतर सगळ्यांची माहिती मिळाल्यानंतर एकमेकींमध्ये वादीवाद लावून आपला पैसे उकळण्याचा उद्योग केला. यामध्ये चारही जणींची एकमेकींकडे बदनामी मात्र केली. हा प्रकार संंबंधितांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यानंतर संबंधिताला शिविगाळ करून ग्रुप सोडून देऊन संबंधिताला ब्लाॅक करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

असे प्रकार सर्वत्र होत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. नाही तर फसगत होण्याची शक्यता आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close