shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट न केल्यास येणाऱ्या सर्वच निवडणुकीत तालुक्यातील १२ ग्रामपंचायती टाकणार मतदानावर बहिष्कार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१

राहुरी : तालुक्यातील मुळा धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट न केल्यास येणाऱ्या सर्वच निवडणुकीत तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तसा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत मुळा धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील मांजरी, पिंपरी अवघड, जांभळी, वावरथ, वडनेर, दरडगाव थडी,  वरवंडी,  घोरपडवाडी, राहुरी खुर्द, कुरणवाडी,  बारागाव नांदूर, तमनर आखाडा आदी गावांमधील शेतकऱ्यांची जमीन मुळा धरण लाभक्षेत्रात संपादीत झाली आहे. धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची तरतूद असताना देखील ६० वर्षांपासून शासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. मुळा धरणग्रस्तांना वंचित ठेवण्यात आले आहे. तरी प्रकल्पग्रस्तांच्या नेमणुकीचे कश्यपी व बारवी हे तत्कालीन धोरणे विचारात घेऊन धरणग्रस्तांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे. या मागणीची शासन स्तरावर दखल न घेतल्यास येणाऱ्या सर्वच निवडणुकीत मतदानावर या बारा ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

यावेळी मुळा धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मारूती बाचकर, उपाध्यक्ष ठकाजी बाचकर,सचिव संतोष बोरूडे, प्रदिप सोडनर, पोपट बाचकर, किशोर बाचकर, कोंडीराम बाचकर, आण्णासाहेब खिलारी, धोंडीराम बाचकर, संदीप बाचकर, अदीनाथ भिसे, जब्बार पठाण, अशोक काळे, नितेश शेलार, सिंकदर शेख, म्हातारबा बाचकर ,मन्सुर देशमुख आदी उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close