shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अँड.हेमंत नरुटे यांची इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड.

अँड.हेमंत नरुटे यांची इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी आपल्या पदाचा शुक्रवार दि.२२ आँक्टोंबर रोजी  राजीनामा दिल्याने या रिक्त जागी गुरूवारी घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत अँड.हेमंत नरुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसभापती पदाच्या रिक्त झालेल्या जागेकरिता गुरुवार दि. ११ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. पिठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व सहाय्यक गट विकास अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती स्वातीताई शेंडे व  सर्व सदस्य उपस्थित होते. या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अँड.हेमंत नरुटे यांची बिनविरोध इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याचे दि.११ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २ : २० वाजता घोषित केले.

२०१७ साली इंदापूर पंचायत समितीची निवडणूक झाल्यापासून इंदापूर पंचायत समितीवर हर्षवर्धन पाटील गटाची एकहाती सत्ता आहे.सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे पाटील गटाकडे आहेत.देवराज जाधव यांचा कार्यकाळ झाल्यानंतर संजय देहाडे यांकडे उपसभापती पदाची जबाबदारी होती.त्यांच्या कालखंडात त्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय दिला.एक धडाडीचा कार्यकर्ता व हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून अल्प काळात संजय देहाडे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी आपल्याकडील पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी आता कोणाची वर्णी लागणार? कोणाला संधी दिली जाणार अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या.अखेर ही संधी आजच्या उपसभापती निवडणूक प्रक्रियेतून अँड.हेमंत नरुटे यांची बिनविरोध उपसभापती पदी निवड झाली .
close