shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्या महामानवाने क्रांतीची बिजे पेरली, अशा क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन- अनीताताई नानासाहेब खरात.

ज्या महामानवाने क्रांतीची बिजे पेरली,  अशा क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना  विनम्र अभिवादन- अनीताताई नानासाहेब खरात.
इंदापूर प्रतिनिधी:शोषित समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या  पुण्यतिथी निमित्ताने आज  तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने महात्मा फुलेच्यां पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
 यावेळी अनीताताई खरात म्हणाल्या की, क्रांती सूर्य महात्मा फुले यांनी कोणत्याही  ऐका समाजासाठी काम केले नसून  सर्व समाजाच्या भल्या साठे काम केले. त्यांनी आपले आयुष्य  हे शिक्षण क्षेत्रात , स्री पुरुष समानता ,यावी  या व अशा सामजिक कामात  आपले आयुष्य घालवले आणि समाजातील स्री शिकली पाहिजे तिने पुरुषा बरोबर शिक्षण घेतले पाहिजे , स्री शिकली तरच प्रगती होणार आहे .या विचाराने प्रेरीत होऊन या  महामानवाने  लोकांचा विरोध होत असताना आपल्या घरातून सावित्री बाई फुले यांच्या माध्यमातून स्री शिक्षणा साठी पुढाकार घेतला. त्याचा फार मोठा विरोध त्यांना झाला पण थोड ही न डगमगता आपले विचार लोकांना पर्यंत  पोचवून आमच्या सारख्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून दीली त्यांनी दिलेल्या  ज्ञान  गंगेमुळे आज आम्ही सर्वांसमोर ताठ मानेने उभा आहोत असे विचार अनीताताई खरात यांनी मत मांडले. 
 या वेळेस तेज पृथ्वी ग्रुप चे उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे, सरचिटणीस सुधीर पाडूळे ,नानासाहेब खरात,हनुमंत येमगर, सोमनाथ वाघमोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
close