shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.नंदू पवार यांचा साकतखुर्द ग्रामस्थांच्या वतीने सन्मान..!!

नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)

अहमदनगर : साकतखुर्द (ता. नगर ) येथील सुपुत्र डॉ.नंदू पवार यांना महाराष्ट्र राज्य नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आरोग्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादासाहेब दरेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के उपस्थित होते.




याप्रसंगी सभापती घिगे म्हणाले, कोरोना काळासारख्या भयानक परिस्थितीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील दोन गोष्टी पहावयास मिळाल्या. एकीकडे काही खासगी हॉस्पिटल मोठया प्रमाणात रुग्णांची लूट करत होते. तर दुसरीकडे मात्र काही डॉक्टर सामाजिक बांधिलकी ठेऊन रुग्णांना अतिशय अल्प दरात घरोघरी जाऊन सेवा पोहचवत होते. याच काळात डॉ. पवार यांनी गोरगरीबांसाठी मोलाचे योगदान दिले.

उपसभापती म्हस्के म्हणाले, साकत गावाने डॉ.पवार यांना दिलेली कौतुकाची थाप ही निश्चितच ऊर्जा देणारी आहे.  दरेकर म्हणाले, ग्रामीण भागातील डॉक्टरांना गरिबीची जाण असते. कोरोनाकाळातील खासगी हॉस्पिटलची लूटमार सांगण्यासारखी नाही. अडचणीच्या काळात डॉ. पवार यांनी केलेली समाजसेवा कौतुकास्पद असून साकतचं नाव त्यांच्यामुळे पुढे जात आहे. यावेळी डॉ. संतोष पवार, पत्रकार अविनाश निमसे ,शिवा म्हस्के यांचाही ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी दत्ताञय चितळकर,  भाऊसाहेब मुंगसे,  सरपंच जाईबाई केदारे, मा. उपसरपंच बाबासाहेब चितळकर, उपसरपंच तात्या वाघमोडे, से. सो. अध्यक्ष अशोक शिंदे, बापू केदारे, प्रा. विठ्ठल वाघमोडे, खरेदी विक्री संघांचे माजी संचालक सुभाष पवार,  रामदास चितळकर, विलास शिंदे, मोहन बोचरे, आन्हाड सर, विकास म्हस्के, महादेव अमृते, शिवाजी झांबरे, गणेश सासवडे, अविनाश पवार,  अविनाश पवार, पांडुरंग शिंदे,बापू निमसे, पाराजी हटकर, किसन महानोर,  शिवाजी बोचरे, मल्हारी चितळकर, योगेश, चितळकर साहेब, धर्मा निमसे, दत्तू निमसे यासह  आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

close