राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ इंदापूर तालुक्यातील गरजवंतांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत - राज्यमंत्री भरणे यांचे आवाहन.
इंदापूर प्रतिनिधी:राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप हा उपक्रम वयोवृद्धांची सेवा करण्याची मोठी संधी आहे.खा.सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ इंदापूर तालुक्यातील गरजवंतांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटपाच्या नियोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर व कोरोना च्या पार्श्वभूमीवर शनिवार दि.२७ नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भरणे बोलत होते.
भरणे म्हणाले की,राष्ट्रीय वयोश्री योजनेचे शिबिर व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महा आरोग्य शिबीर इंदापूर तालुक्यात घेण्यात येणार आहे. या दोन्ही ही शिबीरामध्ये समजातील वयोवृद्ध दिव्यांग नागरिकांची सेवा करण्याची संधी तुम्हा आम्हाला उपलब्ध झाली असून प्रत्येक गरजवंताला या शिबिराचा लाभ मिळवून द्यायचा आहे. यामध्ये दिव्यांगांना ३२ प्रकारचे साहित्य तर वयोवृद्धांना २० प्रकारचे साहित्य तर साडेसात लाख रुपया पर्यंतची शस्त्रक्रिया मोफत मिळणार आहे.
या शिबीरातून वयोवृद्धांची सेवा केल्याचे पुण्य तर मिळणारचं आहे पण त्यांचा हक्क मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे.असं ही भरणे म्हणाले आहेत.तर तालुक्यात कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबांना शासनाच्य वतीने रुपये ५० हजार मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.दरम्यान राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांग योजनेची सविस्तर माहिती बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वीय सहाय्यक नितीन सातव यांनी दिली.
यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे,कालिदास देवकर, माजी सभापती प्रशांत पाटील,शिवाजीराव पाणसरे,युवकाध्यक्ष अँड.शुभम निंबाळकर, युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार,विरोधीपक्ष नेते पोपट शिंदे,आरोग्य सभापती अनिकेत वाघ,नगरसेवक स्वप्निल राऊत, इम्रान शेख,अमोल उन्हाळे,डाॅ.एकनाथ चंदणशिवे,डाॅ.सुहास शेळके,यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.

