अहमदनगर | दि. २६ प्रतिनिधी :
शिर्डी येथील आदर्श पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे तुषार संजय महाजन यांची ग्रीन फाऊंडेशन अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रीन फाऊंडेशन आधारस्तंभ बाळासाहेब कोळपे यांच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वृक्ष संवर्धन मोहीम, वृक्षारोपण कार्यक्रम, आरोग्य शिबीर, गरजूं विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबीर, शाळांमध्ये महाविद्यालयात वृक्ष संवर्धन कार्यक्रमांचे आयोजन, निबंध, वकृत्व स्पर्धा आयोजित करणे, निसर्गाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना राबविणे, झाडे लावा झाडे वाढवा, वृक्ष चळवळ हरित चळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्गाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे संवर्धन करणे काळची गरज आहे. त्या अनुषंगाने ग्रीन फाउंडेशन राबवित असल्याले उपक्रम कौतुकास्पद आहेत ग्रीन फाऊंडेशनचे कार्य सर्व जगभरात पोहचून हरित करण्याचे कार्य करणार असल्याचे पत्रकार तुषार महाजन यांनी सांगितले.

