shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला पोलिस कर्मचाऱ्याची सहकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.

शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर , २०२१ 
पुणे :  एका महिला पोलिस कर्मचाऱ्यानी आपल्या पुरुष सहकाऱ्याच्या मानसिक छळाला व त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला सुसाईड नोट लिहून पाठवली आहे. 
या पिडितेच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या पिडित महिलेचा 31 ऑक्टोबरला साखरपुडा झाला होता. 16 नोव्हेंबरला लग्न होणार होते. ज्यामुळे ती आपल्यामुळ गावी आली होती. परंतु त्यानंतर तिने मंगळवारी म्हणजे दोन ते  तीन नोव्हेंबर दरम्यान आपल्या सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.
पिडितेची ओळख तिच्या सहकाऱ्यासोबत दोन वर्षापूर्वी झाली होती. त्यानंतर तिचा पुरूष सहकारी तिला नेहमी मानसिक व शारिरीक त्रास देऊ लागला. या सगळ्याला मागे टाकत जेव्हा पिडितेने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानंतर त्या पोलिस सहकाऱ्याने तिला धमकी देण्यास सुरवात केली आणि सांगितले की, तुझ्या वडिलांना मारुन टाकेण, तसेच तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला देखील मी आपल्याबद्दल सांगेन. अखेर त्याने नुसतीच धमकी न देता पिडितेच्या घरच्यांना फोन केला आणि पिडितेचं लग्न थांबवण्यासाठी सांगितले. तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली.
ज्यामुळे पिडिता घाबरली. तिच्या घरच्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही तिने आत्महत्या केली. त्यानंतर बहिणीच्या वरील सुसाईड नोट दोखवत पिडितेच्या भावाने यवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल गेला. त्यांनतर पुणे ग्रामीण पोलिस अधिकारी ए. देशमुख आणि बारामतीचे अप्पर अधीक्षक एम. मोहित यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच या आरोपी विरोधाक कारवाई देखील सुरू केली आहे.
या प्रकरणामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी गांभिर्याने तपास करून आरोपीला कडक शासन व्हावे, यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close