shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोहित पवार यांनी लगावला भाजपला टोला ; या निर्णयाचा तरी भाजपने जल्लोष करू नये..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा  प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २० नोव्हेंबर २०२१
प्रतिनिधी : सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून टीकात्मक स्वागत केले जात असताना सत्ताधाऱ्यांकडून माघारीचानिर्णयावरही प्रचारकी प्रतिक्रिया येत आहेत. 
       
              याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी भाजपला टोला लागवला आहे. आधी चूक करायची आणि ती सुधारल्यानंतर त्याचा जल्लोष करायचा ही भाजपची जुनी सवय आहे. त्यामुळं या निर्णयाचा तरी भाजपने जल्लोष करू नये, असा सल्लाही आमदार पवार यांनी दिला आहे.आपल्या ट्विटमध्ये आमदार पवार यांनी म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याच्या केलेल्या घोषणेचं मनापासून स्वागत करतो. देशभरातील शेतकऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणेदिलेल्या लढ्याचं हे यश आहे. सरकारने हा निर्णय आधीच घेतला असता तर शेकडो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते व त्यांचे हालही झाले नसते. आगामी पंजाब आणि उत्तरप्रदेशच्या निवडणुकीनंतरही हा निर्णय असाच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. यापुढे कायदे करत असतांना सरकारने सर्वसामान्य जनतेला आणि विरोधी पक्षाला विश्वासात घेतल्यास सरकारवर अशी वेळ पुन्हा येणार नाही. इंधनाचे दर भरमसाठ वाढवून त्यात थोडी घट करताच भाजपने जल्लोष केला. आधी चूक करायची आणि ती सुधारल्यानंतरत्याचा जल्लोष करायचा ही भाजपची जुनी सवय आहे. त्यामुळं या निर्णयाचा तरी भाजपने जल्लोष करू नये. अन्यथा ती आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा ठरेल, असेही पवार यांनी म्हटलं आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close