shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर मध्ये टाटा मोटर्सच्या शोरूम मधून नऊ वाहनांच्या बॅटरी चोरी..!

संगमनेर:- संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात औद्यागिक वसाहत असून येथे टाटा मोटर्सचे अधिकृत शोरूममध्ये विक्रीसाठी असलेल्या चार चाकी वाहनांपैकी ९ वाहनांच्या बॅटऱ्यां चोरी झाल्याची घटना घडली आहे, सोमवारी येथील औद्योगिक वसाहतीमधील टाटा मोटर्सच्या लीना इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे ही चोरीची घटना घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

याप्रकरणी बुधवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पुणे महामार्गावर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात टाटा मोटर्सचे अधिकृत शोरूम आहे. ९ वाहनांच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
close