नगर : अहमदनगर जिल्हा राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे.पण सोयी- सुविधा, सुधारणेच्या बाबतीत अजूनही मागेच आहे.हे अग्नी कांड दुर्घटनेमुळे दिसून येते.
जिल्हा रुग्णालयालातीअतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत ११जण गुदमरून व आगीत मृत्यू मुखी पडले. सुरुवातीला 10 जणांचा मृत्यू झाला होता.तर 1 रुग्ण गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारा दरम्यान त्या रुग्णाचाही मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे.
दरम्यान मृतांच्या नावाची यादी आता समोर आली आहेत. मृतांमध्ये सहा पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे.
1) रामकिशन विठ्ठल हरपुडे, 2) सिताराम दगडू जाधव, 3) सत्यभामा शिवाजी घोडेचोरे, 4) कडूबाई गंगाधर खाटीक, 5) शिवाजी सदाशिव पवार, 6) कोंडाबाई मधुकर कदम,7) आसराबाई गोविंद नागरे, 8) शबाबी अहमद सय्यद, 9) दिपक विश्वनाथ जडगुळे अशी या मृतांची नोवे आहेत. 11 मृतांपैकी अद्याप दोन जणांची ओळख समोर येऊ शकलेली नाही.
जिल्हा रुग्णालयात आगीमध्ये मृत पावलेल्या मयतांचा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आला आहे यामध्ये 6 रुग्ण गुदमरून मयत झाले आहेत.एकाचा 61% भाजून मृत्यू झाला आहे तर 4 जणांचा भाजून मृत्यू झाला असून एक जणाचा व्हिसेराचे मत राखून ठेवण्यात आले आहे.
असे गुदमरून सहा भाजलेले चार आणि विसेरा राखून ठेवलेला एक अशा 11 रुग्णांचा हा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती आला असून आता या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सरकार काय ठोस पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील खरे वास्तव:
नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातील (Ahmednagar Civil Hospital Fire) ज्या अतिदक्षता विभागात आग लागून ११ जणांनी जीव गमावला, त्या ठिकाणी स्थायी अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नव्हती. अलीकडेच करण्यात आलेल्या फायर ऑडिटमध्ये ही गोष्ट रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आता समोर आले आहे.
जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांसाठी विशेष वॉर्ड करण्यात आला होता. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्याचेच अतिदक्षता विभागात रुपांतर करण्यात आलेले आहे. मात्र, हे करताना अग्निसुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. करोना काळात आगी लागण्याच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले. नगरच्या या रुग्णालयाचेही ऑडिट करण्यात आले होते. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी यासंबंधी पाहणी करून अहवाल दिला होता. यामध्ये पथकाने काही त्रुटी दाखवून दिल्या होत्या. यात आगीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा (फायर अलार्म), आग लागलीच तर पाण्याचे फवारे फवारण्याची सुविधा (स्प्रिकंलर), पाण्याचे पंप अशी स्थायी अग्निशमन यंत्रणा नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्याची तातडीने पूर्तता करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.)
राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे नगरमध्ये येत असून ते या हृदय द्रावक दुर्घटनेबाबत नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.

